Breaking News

खोपोली भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकारांचा सन्मान

खोपोली ः प्रतिनिधी

भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 6) खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर व शहर सरचिटणीस विनायक मांडपे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, डॉ. नचिकेत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजय इंगुलकर यांनी, या वेळी अतिप्रतिकूल परिस्थितीत पत्रकार आपली भूमिका बजावित असतात. वैश्विक महामारी कोरोनासारख्या जीवघेण्या काळातही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून पत्रकारिता केली. आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून पक्षातर्फे त्यांचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद वाटत असल्याचे सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply