
उरण : वार्ताहर
कोरोनाच्या संकट काळात तसेच लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा सर्वत्र भासत आहे. अशा वेळेस सामजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील जसखार येथील आर्यन कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक संस्था वतीने शनिवारी (दि. 30) जसखार येथील रत्नेश्वरी देवीच्या मंदिरातील सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन व सरकारी नियमाचे पालन करून शिबिर झाले. या शिबिराचे आयोजन आर्यन कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा प्रशांत पांडुरंग पाटील यांनी केले होते. शिबिरात सुमारे 80 रक्तदात्यांनी
रक्तदान केले. या वेळी जसखार येथील आर्यन कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा प्रशांत पांडुरंग पाटील, संगिता प्रशांत पाटील, जसखार ग्रामपंचायत सरपंच तथा भाजप नेते दामुशेठ घरत, आर्यन प्रशांत पाटील, महेंद्र घरत, हेमंत ठाकूर, डॉ. घनशाम पाटील, पनवेल येथील श्री साई ब्लड बँकेची टीम व मित्र परिवार आदींनी मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले. कोरोनाच्या संकट प्रसंगी या काळात राज्यभरात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी आपण थोडी मदत करावी या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम राबविला आहे. पुढील काळात सुद्धा जरुरी भासल्यास मदतीचा हात देणार आहोत, असे जसखार येथील आर्यन कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा प्रशांत पाटील यांनी सांगितले.