Breaking News

नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा

भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्‍या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली.
नवी मुंबई शहरातील विविध नोड्स मधील अनेक उद्याने व मैदाने यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत देखभाल दुरुस्ती व वृक्षांची तसेच मैदाने, रोड डीवायडर, ट्री बेल्ट तसेच उद्याने व मैदानातील ओपन जिमचे साहित्य, खेळणी, बेंचेस व ठिकठिकाणी नागरिकांसाठी बसवलेल्या ओपन जिमच्या साहित्याची देखभाल-दुरुस्ती अन्य अभियांत्रिकी कामे न केल्याने व आवश्यक ती निगा न राखल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या विरोधात भावना अधिकच तीव्र झालेल्या आहेत. यासंदर्भात आज एनआरआय पोलीस ठाण्यात दशरथ भगत यांनी माजी नगरसेविका वैजयंती भगत व प्रभागातील नागरिक यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन पत्र देऊन पोलीस अधिकार्‍यांना वस्तुस्थितीची लक्षात आणून देऊन त्यावर सविस्तरपणे चर्चा केली.
या वेळी दशरथ भगत यांनी पोलिस अधिकारी यांस सांगितले की, महापालिकेचे प्रशासन निरंकुश वृत्तीने काम करीत असून, जनतेच्या कर रूपाने जमा झालेल्या पैश्यांची लयलूट करीत आहेत. शहराला ओसाड करून जर महापालिकेच्या तिजोरीची लूट प्रशासन करीत आहेच, परंतु नागरिकांना सुख-सुविधांपासून वंचितदेखील ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांमधील भावनांचा प्रतिदिन उद्रेक होत आहे. म्हणून पोलीस विभागाने समीक्षक म्हणून राहून कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्‍या पालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी भगत यांनी केली.

…अन्यथा निषेध आंदोलन
यासंदर्भात आयुक्त व पोलीस अधिकार्‍यांची संयुक्त बैठकीचे आयोजन न केल्यास अथवा शहरातील उद्याने व अन्य बाबाबींकडे सुधारणा विषयक वेळीच अंमलबजावणी न झाल्यास येत्या 21 फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन घेण्यात येईल ज्यास पोलीस प्रशासनाने उचित समिक्षितता करून सहकार्य करावे, अशी विनंती दशरथ भगत यांनी पोलीस अधिकारी महोदयांना केली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply