Breaking News

काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा
नवी मुंबई : बातमीदार
तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत डोके यांनी तुर्भे रेल्वे यार्डच्या व्यवस्थापकांना हा बेकायदा प्लांट तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे पदाधिकारी व पर्यावरणवादी कार्यकर्ते संकेत डोके यांनी दिला आहे.
मागील दोन ते अडीच महिने रहिवाशांना या बेकायदा प्लांट मधून निर्माण होणार्‍या धुळीचा आणि दिवस रात्र होणार्‍या आवाजाचा त्रास होतो आहे. 100 डेसिबल पेक्षाही जास्त आवाज या प्लॉटमधून येत असतो. रहिवाशांच्या मानसिक आरोग्यावरदेखील त्याचा परिणाम झाला असून अनेक वयस्कर आणि रुग्णमंडळींना जास्त धोका संभवतो. या प्लांटच्या त्रासामुळे जर परिसरातील एखादी व्यक्ती दगावली तर त्याचे संपूर्ण जबाबदारी ही तुर्भे रेल्वे यार्डचे व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा संकेत डोके यांनी दिला आहे. तुर्भे रेल्वे यार्डच्या व्यवस्थापकांनी हा प्लांट बंद करण्याचे कबूल केले आहे मात्र त्या अनुषंगाने कार्यवाही केली नाही तर मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा देखील संकेत डोके यांनी दिला आहे.
तुर्भे रेल्वे यार्ड येथे झालेल्या बैठकीत शिष्टमंडळात भाजपा उपाध्यक्ष संकेत डोके, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब माने, समाजसेवक सुरेश शेटे, अरुण चौथमल, कैलास सगरे, मनोज वैश्य, किरण शिंदे, विनीत मोरे, रमेश सोनी, अशरफ शेख आदी उपस्थित होते यावेळी टर्मिनल मॅनेजर, कोंकर तुर्भे यांना निवेदन देऊन सिमेंट प्लांट तात्काळ बंद करण्यास सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply