Breaking News

शहराच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे

आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन : खोपोलीत आगरी समाजाचा स्नेहमेळावा

खोपोली  : प्रतिनिधी

खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कला क्रिडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत  असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खोपोली आगरी समाजाच्या स्नेहमेळावा व गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ते बोलत होते. खोपोलीतील आगरी समाज सभागृहात रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आकर्षक रांगोळी प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सुमनताई औसरमल, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, किशोर पानसरे, माजी नगरसेविका व भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, माजी नगरसेविका अर्चना पाटील, जिनी सॅम्युयल, शिंदे गट शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासह विविध पक्षीय नेते व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.याप्रसंगी खोपोली आगरी समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती, विद्यार्थी, क्रीडा पटू, व्यवसाहिक, उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव  करण्यात आला. माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, कुलदीपक शेंडे, सुमन औसरमल,  अश्विनी पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करतांना आगरी समाजाच्या कर्तृत्ववान इतिहास व अग्रेसर भविष्याचे कौतुक केले. आगरी समाज सभागृहातील अडचणी सोडवण्यासाठी व सभागृह अधिक भव्य होण्यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार थोरवे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष व माजी नगरसेवक सुभाष घासे यांनी केले. सूत्रसंचालन धर्मेंद्र म्हात्रे यांनी व आभार प्रदर्शन राजेंद्र म्हात्रे यांनी  केले. कार्यक्रमाचे आकर्षक नियोजन व यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष नंदकुमार मिठागरे, उपाध्यक्ष ऍड संतोष कोळंबे, सचिव अभिजित पिंगळे, खजिनदार राजेंद्र म्हात्रे, संजय पाटील यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply