Breaking News

शासकीय सवलतींसाठी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र आढल्यास निलंबन

खारघर : प्रतिनिधी
दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र देणार्‍या जवळपास 78 शिक्षकांचे बीड जिल्ह्यात निलंबन करण्यात आले आहे. बदली करण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचे उघड या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बदलीसाठिचा हा प्रकार धक्कादायक आहे.पनवेल तालुक्यात देखील तब्बल 850 शासकीय शिक्षक कार्यरत आहेत.तालुक्यात असा प्रकार उघडकीस आलेला नसला तरी बीड मधील या प्रकारामुळे या प्रकाराबाबत सर्वत्रच चौकशीचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे.मूळ प्रमाणपत्र व पुनर्तपासणीच्या अहवालात या शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत फरक आढळल्याने या संबंधित गुरुजींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर त्यांच्या दालनात ही सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान, अखेर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणार्‍या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांवर बीडचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी 78 निलंबनाची कारवाई केली आहे. आवडत्या ठिकाणी बदलीसाठी या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतला. अशा प्रकारामुळे खर्‍या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. बीडमधील या प्रकाराचा धडा घेऊन शिक्षण विभागाने राज्यभरात चौकशी समिती नेमण्याची गरज आहे.

14 लाख बीएड झालेले शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. बोगस संस्था उभारून सरकारचे अनुदान लाटले जात असल्याचेदेखील प्रकार घडत आहेत. शासनाने बीडच्या प्रकाराची दखल घेऊन या शिक्षकांची निवड करणार्‍यावर देखील कारवाईची गरज आहे. हा प्रकार अंत्यत गंभीर आहे.
-अर्जुन कोळी, अध्यक्ष, नगरपालिका व महापालिका शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य

पनवेल तालुक्यात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तालुक्यात 850 शिक्षक कार्यरत आहे.
-एस. आर. मोहिते, वरिष्ठ विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग पनवेल )

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply