पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय मजदूर पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मन्सूक मांडविया यांची जेएनपीटीच्या विश्रामगृहात भेट घेतली व स्वागत केले.
या वेळी मंत्री मन्सूक मांडविया यांना जेएनपीटी तृतीय व चतुर्थ श्रेणी कायमस्वरूपी कामगारांच्या टाऊनशिपमध्ये राहणार्या कामगारांची एचआरए ओव्हरटाईम भत्त्यांच्या सप्टेंबर 2002पासून आजपर्यंत फरकाची रक्कम मिळावी, जेएनपीटीतील प्रथम व द्वितीय श्रेणी वर्ग अधिकार्यांप्रमाणे जानेवारी 2007पासून आजपर्यंत कॅफेटेरियाची थकबाकी, जेई कॅटेगरीस अस्तित्वात असलेली एकास एक रिलिव्हर सिस्टम तशीच चालू ठेवावी, अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना परमनंट कामगारांमध्ये भारती व कुशल व परमनंट पगार, भत्ते व सुविधा चालू ठेवण्याविषयी, पीएसएमध्ये जेएनपीटीच्या प्रमाणात नवीन कामगारांची भारती व जेएनपीटीतील चारशेच्यावर व परमनंट व रिटायर्ड कामगारांच्या जागी नवीन कामगारांची भरती करणे, तसेच जेएनपीटी कंत्राटी कामागरांचा सेवाकाळ 58 वर्षावरून 60 वर्षे करणे आदी मागण्या करण्यात आल्या.