पनवेल : वार्ताहर
प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी प्रत्येजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. खारघर येथील मेडीकव्हर रूग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रेमदिनी ही एक अनोखी बाब असून आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रियजनांकडून अवयव दान करण्याचे उचललेले धाडसी पाऊल आहे. दात्यांनी घेतलेल्या अतिशय धाडसी कृतीने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या दात्यांचे सर्वच स्तरांतून कौतूक केले जात आहे. रवींद्रनाथ शेंदरे या 38 वर्षांच्या रूग्णाला हिपॅटायटीस बीचे निदान झाले, वैद्यकीय उपचारानंतरही नोव्हेंबर महिन्यात त्यांचे यकृत निकामी झाले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासणी आणि उपचार करूनही प्रकृतीत कोणतीच सुधारणा नसल्याने यावर प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग होता. अशा परिस्थितीत पत्नी दीपाली शेंदरे यांनी यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. आता दाता आणि प्राप्तकर्ता दोघेही बरे झाले असून सर्वसामान्य जीवनशैली जगत आहेत. बड चियारी सिंड्रोमचे निदान झालेल्या 38 वर्षीय महेंद्र बोरडे पाटील वेनोप्लास्टी करण्यात आली मात्र रात्रीतून त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना यकृत प्रत्यारोपण करावे लागले. त्यांचा रक्तगट बी होता आणि त्यांच्या कुटुंबात कोणताही रक्तगट जुळणारा रक्तदाता नव्हता. त्यांची पत्नी रूपाली ही यकृत दान करण्यास इच्छुक होती, परंतु तिचा रक्तगट ए होता. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एबीओ-विसंगत यकृत प्रत्यारोपणासाठी यशस्वीरित्या केले असून आता तो रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे. दिगंबर देशपांडे यांना ऑटोइम्यून यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. त्यांचे यकृताचे कार्य बिघडत होते आणि लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. त्याच्या बहीणीने यकृत दानाचा निर्णय घेत यकृताचा डावा भाग दान केला. हा रुग्ण आता बरा होत आहे. अंतिम टप्प्यातील यकृत आजाराचे निदान झालेल्या व्यक्तींना तातडीने प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. अवयवदान मोहिमेला चालना देणे आणि गरजूंना नवीन जीवन देणे ही काळाची गरज आहे. अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्य असल्याचे डॉ. विक्रम राऊत, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि एचपीबी सर्जरीचे संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांनी स्पष्ट केले. सर्वच प्रकरणातून खर्या प्रेमाची प्रचिती आली असून आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी स्वतच्या जीवाची बाजी लावून अवयव दान करणे हे केवळ त्या व्यक्तीवरील असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य होऊ शकते असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. आम्हाला विश्वास आहे की, या ठिकाणी कार्यरत असलेला यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग सर्वच यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराशी लढणार्या रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरेल, अशी प्रतिक्रिया डॉ नवीन के एन, केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी व्यक्त केली. या शस्त्रक्रियेत डॉ. हार्दिक पहारी, डॉ. अमृता राज, डॉ. अमेय सोनावणे आणि डॉ. अमरीन सांवत आणि डॉ. जयश्री व्ही यांचा सहभाग होता.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …