Breaking News

आदिवासी वाड्यांतील नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न

मुंबई : रामप्रहर वृत्त
पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांत राहणारे नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या उंबरमाळ, तांबाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी तसेच खऊसावाडी येथील नागरिक गत 75 वर्षांपासून मतदानाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे जानेवारी 2023मध्ये निदर्शनास आले आहे. या गावांमध्ये सुमारे 3500 आदिवासी बांधवांची लोकवस्ती असून या वाड्यांपासून जवळच असलेल्या बोरगाव व मळेघर या दोन्ही ग्रामपंचायतींनी हे आदिवासीपाडे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितल्यामुळे या आदिवासी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावता आलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क तातडीने मिळण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, अशी विचारणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
यावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून सांगितले की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या उंबरमाळ, तांबाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी तसेच खऊसावाडी येथील नागरिक गत 75 वर्षांपासून मतदानाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावांमध्ये सुमारे 3500 आदिवासी बांधवाची लोकवस्ती असून या वाड्यांपासून जवळच असलेल्या बोरगाव व मळेघर या दोन्ही ग्रामपंचायतींनी हे आदिवासीपाडे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितल्यामुळे या आदिवासी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याची बाब अंशत: खरी आहे.
पेण तालुक्यातील उंबरमाळ, तांबडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी व खऊसावाडी आदिवासी वाड्यांमध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 562 इतकी आहे. या आदिवासी वाड्यांमधील नागरिकांची नावे पेण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्यानुसार हे मतदार लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला मतदान करतात. तथापि, या वाड्यांचा शेजारच्या बोरगाव व मळेघर या दोन्ही ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनमध्ये समावेश न झाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या ग्रामस्थांनी मतदान केलेले नाही. तथापि सन 2023मध्ये बोरगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेमध्ये या पाच वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply