Breaking News

पालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर मेळाव्यात केले.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंजूर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पनवेल महानगरपालिकेसह कोकण विभागीय नगरपालिका, नगरपंचायत कामगार कर्मचार्‍यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शनिवारी (दि. 20) झाला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, बबनराव झिजूडै, सुनील वाळुंजकर, रमाकांत बने, संतोष पवार, अनिल जाधव, शैलश गायकवाड, अनंता पाटील, दत्तगुरू म्हात्रे, मनोज पुलेकर, अंकुश गायकवाड, बापूसाहेब सदाफुले, राकेश पाटील, अजिंक्य हुलवणे, भूषण काबाडी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही कर्मचार्‍यांच्या
मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply