मुंबई ः प्रतिनिधी
पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार बांधवांना उद्भवणार्या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून या मच्छीमारांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे धोरण ठरवण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत केली.
पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आणि माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 23) रात्री मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण ठरवण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर चर्चा करताना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आपली भूमिका मांडून रायगड तसेच आसपासच्या परिसरातील पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार बांधवांना उद्भवणार्या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून या मच्छीमारांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे धोरण ठरवण्याची मागणी केली.
या बैठकीला मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार सर्वश्री रमेश पाटील, राजन साळवी, भाई जगताप, मनिषा चौधरी, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, प्रवीण दटके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …