Breaking News

कर्जतमध्ये पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीच्या पोटात कैची खुपसून आणि नंतर शिलाई मशीन डोक्यात घालून तिची हत्या केली. कर्जत-कल्याण रस्त्यावरील हलिवली भागात शुक्रवारी (दि. 3) सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कर्जत येथील हालिवली ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सिंगनेचर डिझायर संकुल या इमारतीत संजय रामजे भालेराव हा आपल्या पत्नी मुलांसोबत भाडे तत्वावर राहत आहे. संजय आणि पत्नी पूजा यांच्यामध्ये गुरुवारी वाद झाला होता. यावरून पूजाने कर्जत पोलीस ठाण्यात संजयविरोधात तक्रार दिली. यानंतर पूजा ही आपल्या भावाकडे वांगणी येथे राहण्यासाठी गेली होती. मुलीने बोलाविल्याने पूजा तिला भेटायला सकाळी हालिवली येथील घरी आली होती.
या वेळी पती संजयने मुलीला हॉलमध्ये बाहेर ठेवून पत्नीला बेडरूममध्ये कोंडून कपडे कापणार्‍या कैचीने पत्नी पूजाच्या पोटात व पाठीवर चार ते पाच ठिकाणी खुपसलेे. त्यानंतर शिलाई मशीन डोक्यात घालून तिचा खून केला. या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून पळ काढत असताना असणार्‍या पतीसमोरच अचानक सासू उपस्थित झाल्याने संजयने त्यांनादेखील धमकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला काही तासांतच ताब्यात घेतले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply