Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने आपल्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत 100 टक्के यश संपादन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागामध्ये सिद्धी कुलकर्णी हिने 83.83 टक्के तर कॉमर्स विभागात 88.83 टक्के गुण प्राप्त करून निया चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागातून बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 76 विद्यार्थी बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सायन्स शाखेतून 83.83 टक्के गुण मिळवून सिद्धी कुलकर्णी प्रथम, अस्मिता देवकर 83.50 टक्के द्वितीय आणि स्मृती पात्रोने 82.17 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. पाच विद्यार्थी 75 टक्केपेक्षा जास्त तर 60 विद्यार्थी ग्रेड 1 आणि 11 विद्यार्थी ग्रेड 2 कॅटेगरीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
कॉमर्स शाखेतून नीया चव्हाणने 88.83 टक्के मिळवून प्रथम, राहुल म्हात्रेने 82.33 मिळवून द्वितीय आणि स्मिता शर्माने 79.67 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच नऊ विद्यार्थी 75 टक्केपेक्षा जास्त तर 43 विद्यार्थी ग्रेड 1 आणि 27 विद्यार्थी ग्रेड 2 कॅटेगरीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत 12वीच्या परीक्षेच्या निकालात शाळेचा निकाल 100 टक्के लावला आहे. 75 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ते सर्वच्या सर्व 75 विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये नायला कुंडलिक हिने 77.83 टक्के मिळवत प्रथम, फैसल सागवेकर 77 टक्के मिळवत द्वितीय आणि तनीश म्हात्रे याने 76.17 टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
तीन विद्यार्थी 75 टक्के, 26 विद्यार्थी ग्रेड 1 तर तर 46 विद्यार्थी ग्रेट 2 कॅटेगरीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, मुख्याध्यापिका प्रणीता गोळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply