सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
उरण : वार्ताहर
राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे ठाणे खाडीपुलावरील समर्पित माल वाहतूक मार्गिका प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील रांजणपाडा येथे बांधण्यात येणार्या लेव्हल क्रॉसिंग क्र. 2 व 3 या रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले. हा कार्यक्रम उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, मुंबई बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संध्या सापटणेकर, ठाणे खाडी पूल विभाग क्र. 1 नवी मुंबईच्या कार्यकारी अभियंता स्वाती पाठक, ठाणे खाडी पूल विभाग क्र. 2 तुर्भेचे उपविभागीय अधिकारी प्र. म. धस, ठाणे खाडी पूल विभाग क्र. 4 तुर्भेचे उपविभागीय अधिकारी सु. ढा. आढे यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.