महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी कमला देशेकर यांची नियुक्ती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पनवेल तालुक्यात गाव कार्यकर्ता भेट दौरा केला. या दौर्यादरम्यान त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासोबतच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. या वेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी कमला एकनाथ देशेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
चिंध्रण पंचायत समिती विभागातील करंबेळी, शिरवली, पालेवाडी, महोदर, कुत्तरपाडा, महालुंगी, चिंध्रण गावांची बैठक चिंध्रण येथील हनुमान तसेच हरिग्राम, वाकडी, उसर्ली, उमरोली, भानघर, खानाव, मोर्बे, खैरवाडी गावांची बैठक वाकडी येथे नरेश पाटील यांच्या निवासस्थानी झाली. त्याचप्रमाणे आदई पंचायत समिती विभागातील आकुर्ली ग्रामपंचायत, आदई ग्रामपंचायत, चिपळे ग्रामपंचायत व केवाळे ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांची बैठक आकुर्ली येथे अनिल पाटील यांच्या फार्महाऊसवर झाली.
या बैठकांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप नेते एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, आकुर्लीचे माजी सरपंच सचिन पाटील, चिंध्रणच्या माजी सरपंच कमला देशेकर, हभप पद्माकर महाराज, नरेश पाटील, सुनील पाटील, राज पाटील, राजा भोईर, महादेव गडगे, तुकाराम पाटील, लक्ष्मण पाटील, बाळाराम पाटील, गणेश रंधावी, परशुराम रिकामे, भगवान कडू, दीपक पाटील, अशोक पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी कमला देशेकर यांची नियुक्ती करून आमदार प्रशांत ठाकूर व भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.