दुबई : वृत्तसंस्था
वर्ल्ड कप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. आयसीसी देखील वर्ल्ड कपसाठीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करत आहे. कॉमेंटेटरमुळे सामन्यात आणखी रंगत येते. वर्ल्डकपसाठी आयसीसीने एकूण 24 कॉमेंटेटरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच कॉमेंटेटरना संधी देण्यात आली आहे.
भारताकडून एकूण तीन कॉमेंटेटरची निवड करण्यात आली आहे. या तीन पैकी दोन कॉमेंटेटर हे मराठी आहेत. यात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरचा देखील समावेश आहे, तसेच हर्षा भोगले आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट रसिकांना या तिन्ही कॉमेंटेटरची रंगतदार कॉमेंट्री ऐकण्याची संधी मिळणार आहे.