Breaking News

मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात 42 दुचाकींना आग

पनवेल : वार्ताहर

हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या तब्बल 42 दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. सोमवारी (दि. 28) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या भीषण आगीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना ही आग लागली आहे. स्थानक परिसरातील वाहनतळ बंद असल्याने हार्बर मार्गांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना नाईलाजाने परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर वाहन उभी करण्यासाठी करावा लागतो. आगीत पार्किंमध्ये उभा करण्यात आलेल्या 42 गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीससुद्धा घटनास्थळी रवाना झाले होते. समाजकंटकाकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply