उरण ः वार्ताहर
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीसपदी रय्यान अन्वर तुंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी दिले. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शहानवाज मुकादम, नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष महेश कडू, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर युवा अध्यक्ष नीलेश पाटील, जसीम गॅस, इरफान शेख, यासीन तुंगेकर आदी उपस्थित होते.