Breaking News

12 धरण क्षेत्रात अद्याप 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठी

रायगड जिल्ह्यातील स्थिती : रानीवली धरणात कमी साठा तर उसरण धरण क्षेत्रात सर्वात जास्त पाणीसाठा

रोहे : प्रतिनिधी

यावर्षी उन्हाळ्यात सातत्याने पारा चढत आहे. याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर होत आहे. मागील पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्याने अद्याप एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत सहा धरणांचा अपवाद वगळता उर्वरित 22 धरण क्षेत्रात पाणीसाठा चांगला आहे. परंतु उन्हाळ्यात पारा सातत्याने चढत असल्याने त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होताना दिसत आहे. अद्याप पाऊस  सुरु होण्यास 2 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात 15 जूनपर्यंत तरी पाणीसाठा उपलब्ध राहीला पाहिजे. याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरण क्षेत्रात 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर सर्वात जास्त पाणीसाठा 80 टक्के पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात उपलब्ध आहे.

रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रापैकी 12 धरण क्षेत्रात अद्याप 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध यामध्ये  वावा धरण क्षेत्रात 60 टक्के, सुतारवाडी धरण क्षेत्रात 61 टक्के, आंबेघर धरण क्षेत्रात 78 टक्के,उन्हेरे धरण क्षेत्रात 63 टक्के, पाभरे धरण क्षेत्रात 75 टक्के, संदेरी धरण क्षेत्रात 55 टक्के, वरंध धरण क्षेत्रात 53 टक्के, खिंडवाडी धरण क्षेत्रात 53 टक्के, कोथुर्डे धरण क्षेत्रात 64 टक्के,कलोते मोकाशी धरण क्षेत्रात 56 टक्के, मोरबे धरण क्षेत्रात 53 टक्के,उसरण धरण क्षेत्रात 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर 28 धरण क्षेत्रापैकी 6 धरण क्षेत्रात 35 टक्के पेक्षा कमी पाणी साठा उपलब्ध आहे यामध्ये फणसाड धरण क्षेत्रात 26 टक्के,श्रीगाव धरण क्षेत्रात 24 टक्के,ढोकशेत धरण क्षेत्रात 32 टक्के,रानीवली धरण क्षेत्रात 13 टक्के,अवसरे धरण क्षेत्रात 27 टक्केडोणवत धरण क्षेत्रात  31 टक्के या धरणाचा समावेश आहे.

रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या धरणामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात 26 टक्के पाणीसाठा उपलब्ध, तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात 60 टक्के पाणीसाठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात 61 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात 78 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात 24 टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात 37 टक्के पाणीसाठा उपलब्ध, ढोकशेत धरण क्षेत्रात 32 टक्के पाणी साठा उपलब्ध, कवेळे धरण क्षेत्रात 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरण क्षेत्रात 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात 41 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात 42 टक्के पाणी साठा उपलब्ध, रानीवली धरण क्षेत्रात 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात 75 टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात 55 टक्के पाणीसाठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात 53 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात 53 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात 64 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात 42 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरण क्षेत्रात 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात 44 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात 56 टक्के पाणीसाठा उपलब्ध, डोणवत धरण क्षेत्रात  31 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात 53 टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरण क्षेत्रात 42 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply