उरण ः प्रतिनिधी
अलिबाग येथे स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये उरण तालुक्यातील पूर्व विभागातील गोशीनरियु कराटेपटूंनी पदके जिंकली.स्पर्धेत उरणमधील अमिता अरुण घरत, अमिषा अरुण घरत, सेजल नामदेव पाटील, अर्णव सुशांत पाटील, रोहित शरद घरत, आयुष सुधाकर पाटील, यश रामचंद्र मोकल, सुजित कृष्णा पाटील, शुभम नितीन ठाकूर, अनिष चंद्रहास पाटील, अमर अरुण घरत यांनी सुवर्णपदक, तर मानसी नितीन ठाकूर हिने रौप्यपदक पटकाविले. या सर्वांची जळगाव येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कराटेपटूंना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणारे गोशीनरियु कराटेचे उरण तालुका प्रमुख गोपाळ म्हात्रे, सिहान राजू कोळी, राकेश म्हात्रे, नितीन ठाकूर यांचे सहकार्य मिळाले आहे. यशस्वी कराटेपटूंचे अभिनंदन होत आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …