पेण : प्रतिनिधी
येथील कुंभार आळीतील गणेशमूर्ती कारखानदार आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी पेणमधील शासकीय क्रीडा संकुलच्या सभागृहात राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातील निवडक शंभर मूर्तिकारांना या प्रदर्शनात आपल्या मूर्तीचे सादरीकरण करण्याची देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे आणि करण पाटील हे या वेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून पेण व परिसरातील गणेशभक्त, मूर्तिकार आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन कुंभार आळी कारखानदार आणि मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.