Breaking News

पर्यटक जंजिरा किल्ला जेट्टीच्या प्रतिक्षेत

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश विदेशातून येणार्‍या पर्यटकांना किल्ल्यावर चढता व उतरताना  सहज सोपे जावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत सदरील जेट्टी बांधण्यासाठी 93.56 कोटी रुपये मंजूर झाले असून याची निविदा प्रक्रिया सुद्धा करण्यात आली असून सागरी मंडळाने या कामासाठी निविदा सुद्धा जारी केली असून नोव्हेंबर महिन्यात हि निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित ठेकेदारास हे काम दिले जाऊन लवकरच या किल्ल्यावर जेट्टीच्या कामाची सुरुवात होईल अशी माहिती महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डातील वरिष्ठ अधिकारी सुधीर देवरे यांनी नुकतीच दिली आहे.सदरील काम दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सुखरूप किल्यावर उतरण्यासाठी जेट्टीची खूप आवश्यकता होती.तशी मागणी हि वेळोवेळी करण्यात आली होती.कारण जेव्हा किल्ल्यावर पर्यटक जात असत जर त्यावेळी भरतीची वेळ असेल तर किल्ल्याच्या पुढील भागात दर्शनी दरवाज्याजवळ उतरावे लागत असे अश्या वेळी शिडाच्या बोटींमधून उतरताना बोट हेलकावे खात असत त्यामुळे विशेषतः महिलांना व लहान मुलांना उतरवताना बोट धारकांना तारेवरची कसरत करावी लागत असे अश्यावेळी अपघात सुद्धा घडलेले आहेत.

सुरुवातीला किल्ल्याच्या दर्शनी भागावरच जेट्टी बांधण्याचे प्रयोजन करण्यात आले होते.परंतु दर्शनी दरवाज्याजवळ लाटांचा खूप जोरदार मारा असल्याने येथे जेट्टी टिकू शकणार नाही हे तद्न्य तांत्रिक वर्गानी सांगितल्यावर किल्ल्याच्या मागील बाजूचा विचार करण्यात आला.किल्ल्याच्या मागील बाजूस लाटांचा मारा नसून येथील समुद्राचे पाणी शांत असल्याने येथे जेट्टी होण्यास शक्य असल्याने सदरील जागेची निवड केल्यावर महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून तसा प्रस्ताव पुरातत्व खात्याकडे पाठवण्यात आला.प्रस्ताव योग्य असल्याने पुरातत्व खात्याने सुद्धा मंजुरी दिली आहे. 500 पर्यटक सुरक्षित उतरतील अशी भव्य जेटी बनणार व समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी 250 फूट लांबीचा ब्रेकवॉटर ( भित ) 93.56 कोटी खर्चून  बनवण्यात येणार आहे अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली होती. मे महिना जवळ येऊन सुधा जेट्टीच्या कामास सुरुवात झाली नाही.त्यामुळे यंदा तरी काम सुरू होणार का असा सवाल पर्यटक विचारत आहेत.अजूनपर्यंत या जेत्तीच्या कामाचे भूमिपूजन न झाल्याने या कामाचा मुहरत कधी सापडणार असाच सवाल सर्व पर्यटक विचारत आहेत नोव्हेंबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुधा जंजिरा किल्ल्यावरील जेट्टी साठी लागणारा एक दगड सुधा न हलल्याने खरोखर या जेट्टीचे काम होईल किंवा नाही असाच सवाल सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.

जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी  साडेपाच लाख पर्यटक येतात मागील दोन वर्षापासून जेत्तीचे काम होणार म्हणून सांगण्यात येत आहे परंतु अजुनपर्यंत काम सुरू होत नसल्याने पर्यटक र्ीं स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply