उरण : वार्ताहर
मिशन स्वच्छ भारत या योजनेंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी ’स्वच्छता मॉनिटर’ जबाबदारी स्वीकारून इतरांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम दि. 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणार्या उरण तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाचा सन्मान सोमवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वच्छता मॅानिटर अभियानात विद्यार्थ्यांना कोणी निष्काळजीपणे कचरा फेकताना किव्हा थुंकताना दिसले तर फक्त त्या व्यक्तीला थांबवून केलेली चूक लक्षात आणून देण्याचे काम करायचे. अनेक शाळा सक्रिय होत हजारो विद्यार्थ्यांनी लोकांना असे कृत्य करण्यापासून थांबवण्याच्या अनुभवांचे विवरण फेसबूक किंवा ईन्स्टाग्राम वर पोस्ट करायचे होते.प्रकल्पात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सक्रिय 5 जिल्हे असल्याचा मान जालना, बुलढाणा, मुंबई (नॉर्थ), पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनी पटकावला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्याालय या शाळेची निवड झाली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणार्या निवडक विद्यार्थ्यांना सन्मानित करून राज्यात कुठेही कार्यरत राहण्याच्या दृष्टीने आयकार्ड देण्यात येणार आहे.
मुंबई मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागातर्फे सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, शिक्षिका अंकीता पाटील, शाळेच्या चार विद्यार्थी मॉनिटर अक्षरा ठाकूर, समिक्षा सावंत, संस्कृती घरत, हंसिका ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. राज्यातील हजारो शाळांमधून तसेच रायगड जिल्ह्यातील ऐकमेव उरण तालुक्यातील शाळेचा सन्मान झाल्याने जनार्दन शिक्षण संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव एस. टी. गडदे, शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत यांनी शाळेचे कौतुक केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …