अलिबाग : जिमाका
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (ततझ-ढ: तेींशी तशीळषळशव झरशिी र्-ीवळीं ढीरळश्र) मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून, या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
अलिबाग एसटी स्टँडच्या आवारात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन वापराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी नवमतदारांना मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर, त्यासोबत असणार्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व त्याची माहिती देण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, तहसीलदार सचिन सेजाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रे, गर्दीची ठिकाणे, बाजार आदी ठिकाणी जनजागृती पथकाकडून नागरिकांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 1683 ठिकाणी जनजागृती रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1683 ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये पनवेलमध्ये 143, कर्जतमध्ये 229, उरणमध्ये 177, पेणमध्ये 292, अलिबागमध्ये 221, श्रीवर्धनमध्ये 282 आणि महाडमध्ये 339 ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.