Breaking News

पराग बोरसे व विद्यार्थ्यांच्या चित्रांचे सिंगापूरमध्ये प्रदर्शन

कर्जत : प्रतिनिधी
कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांची चित्रे आजवर मुंबई, पुणे, दिल्ली, दुबई, अमेरिका, चीन अशा अनेक ठिकाणच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत तसेच बोरसे हे विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरीदेखील ठरले आहेत. आता त्यांच्या व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापूरमध्ये भरविण्यात आले आहे. आजवर कुठल्याही भारतीय चित्रकाराच्या समवेत त्याच्या देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापूरमध्ये भरवण्याची ही पहिलीच वेळ असावी.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटाने अनेक चांगल्या-वाईट गोष्टींना जन्म दिला. लॉकडाऊनच्या काळात सर्व आर्ट गॅलरी बंद असताना मुबलक वेळ हाती मिळाल्यामुळे पराग बोरसे यांनी चित्रकला ऑनलाइन शिकवण्यास सुरुवात केली. या संधीचा लाभ अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत तसेच भारतामध्ये राहणार्‍या अनेक कला विद्यार्थ्यांनी घेतला. गेली दोन वर्षे या विविध देशांतील विद्यार्थ्यांनी बोरसेंकडे चित्रकला शिकून जी चित्रे साकारली, त्यातील काही निवडक अशा कलाकृतींचे प्रदर्शन सिंगापूरमधील द् विजुअल आर्ट्स सेंटर या कला दालनात भरवण्यात आले आहे.
पुरुषप्रधान असलेल्या चित्रकलेच्या क्षेत्रात तेही एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणार्‍या सर्वच्या सर्व कलावंत महिला आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पराग बोरसे यांनी कलाक्षेत्रातील पुरुषप्रधान परंपरेला छेद देत स्त्रियादेखील चित्र कलेच्या क्षेत्रात मुळीच मागे नाहीत हे जगाला दाखवून दिले आहे. या प्रदर्शनाचे नावदेखील ’ईक्षणा’ असे दिले आहे. ’ईक्षणा’ म्हणजे पाहणे आणि काळजी घेणे. हे प्रदर्शन 7 मेपर्यंत पाहण्यास खुले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply