Breaking News

खारघर तळोजा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी साधना पवार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मान्यतेने, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व ज्येष्ठ नेते प्रभाकर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडल महिला मोर्चाचे अध्यक्षपदी साधना अशोक पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांना पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. साधना पवार या 2014पासून पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत निरपेक्षपणे व जबाबदारीने पक्ष संघटनेच्या कार्य करीत आहेत. दोन टर्म महिला मोर्चा सरचिटणीस म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. शक्ती केंद्र म्हणूनसुद्धा त्या सध्या काम पाहत आहेत. खारघरमधील मराठा समाजाच्या उपाध्यक्ष तसेच युनिटी महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सध्या शिवबंधन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्य करीत आहेत. यामुळे त्यांना भारतीय जनता पक्ष खारघर मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पदाची धुरा दिली गेली आहे.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नाप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक मोना अडवाणी, सोशल मीडिया मंडल संयोजक अजय माळी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल साबने, संतोष शर्मा, अशोक पवार,विजय भोसले, ब्रिजमोहन, मधुमिता जेना, अश्विनी भुवड, अर्चना घोरपडे, वैशाली देसाई, मीनाक्षी अंथवाल, स्नेहल बुधाई, कांचन बिर्ला,लक्षमीं सरकार, सोनिया गव्हाणे, प्रिया दळवी, निर्मला यादव, प्राजक्ता शिंदे, संध्या भोसले, बिंदियाजी हे उपस्थित होते. खारघर तळोजा परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply