पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एस टेनिस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई ओपन टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई परिसरातील दोनशेच्या वर खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धा 8, 10, 13, 16 वर्षाखालील, खुला गट तसेच 35 वर्षावरील अशा विविध गटांत घेण्यात आली. या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षकांचीही वेगळी स्पर्धा घेण्यात आली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी एकूण सव्वा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ विजय घरत, किशोर पाटील, श्यामनाथ पुंडे, जयवंत निकम आदी उपस्थित होते.
गटनिहाय विजेते व उपविजेते
आठ वर्षाखालील (बिगिनर) : श्रिया विमल, सिमरन मधुवार; 10 वर्षाखालील मुले : अमन इनामदार, सोहम जिंदाल; मुली : ईरा आयथन, रेणुका म्हाशाळे; 13 वर्षाखालील मुले : ध्रु सेहगल, मेहूल सैमी; मुली : ईरा आयथन, शहजीन; 16 वर्षाखालील : शौर्या बिराजदार, मेहूल सैमी; खुला गट : अजमैर शैख, अरुण भोसले; दुहेरी : अथर्व व नरेंद्र, अजमैर व अरुण, 35 वर्षावरील : राजेश कुमार, वरूण चोप्रा; प्रशिक्षक गट : विकी प्रजापती, संदीप पवार.
Check Also
महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव
महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …