Breaking News

माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक

पनवेल : प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंतर्गत तीन ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तमकामगिरी करणार्‍या अमृत शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
मुंबई नरिमन पॉईंट येथे सोमवारी (दि. 5) माझी वसुंधरा 3.0 सन्मान पारितोषिक वितरण सोहळा झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महापालिकेचे गणेश देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त कैलास गावडे,  विठ्ठल डाके, गणेश शेटे, प्रकल्प कार्यकारी अभियंता श्री संजय काटेकर यांच्या समवेत पुरस्कार स्वीकारला.
या समारंभास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply