उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खलील पटेल व इरफान मुल्ला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.
उरण येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी (दि. 3) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आपट्याचे माजी सरपंच दत्ता पाटील, ग्रामपंचायत सदस्य असद अश्फाक पिठ्ठू, भाजप नेते फय्याजशेठ दाखवे, खलील पटेल, रियाझ मुल्ला, तारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, बाळूशेठ पाटील, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, प्रफुल्ल पाटील, अंजुम काझी, शरद वाघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खलील पटेल व इरफान मुल्ला यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. हा माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …