Sunday , September 24 2023

रायगडच्या मुलींचा क्रिकेट संघ विजयी

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत नाशिक येथे नुकतेच मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. रायगड संघाने तीनपैकी दोन सामने जिंकत दमदार कामगिरी केली .
पहिला सामना रायगड विरुद्ध नाशिक असा होता, ज्यात नाशिक संघ प्रथम फलंदाजी करताना 28 षटकांत 172 धावांमध्ये गारद झाला. प्रत्युत्तरात रायगडकडून रोशनी पारधी हिने 101 चेंडूंमध्ये 113 धावांची शतकी खेळी करीत संघाला दमदार विजय मिळवून दिला. तिने गोलंदाजीमध्येही सुंदर कामगिरी करीत दोन विकेट घेतल्या तसेच काही झेल पकडून अष्टपैलू कामगिरी नोंदविली.
रायगडचा दुसरा सामना सांगलीबरोबर झाला. यामध्ये सांगली संघ जिंकला. रायगडचा तिसरा सामना विजय या संघाबरोबर झाला. रायगडकडून आर्या पाटील हिने 34 धावा आणि समिधा तांडेलने 30 धावा बनवून संघाला 148वर नेऊन ठेवले. रायगडच्या गोलंदाजीसमोर विजयचा डाव 30 षटकांमध्ये 109 धावांत संपुष्टात आला. रायगडच्या आर्या गडदे चार, तर रोशनी पारधीने तीन विकेट घेतल्या. सिरीजमध्ये रोशनी पारधीने 158 धावा, सहा विकेट आणि काही अवघड झेल टिपून स्टार परफॉर्मर खेळाडूची मानकरी ठरली.
रायगडच्या संघात कर्णधार समिधा तांडेल, आर्या गडदे (खोपोली), रोशनी पारधी, प्रचिती जाधव (महाड), ईश्वरी खेत्री, मधुरा बाबर, अनिष्का वर्मा, प्रियांशी गायकवाड, वैदश्री शेळके (पनवेल), आर्या पाटील (उरण), वैभवी कुलकर्णी, आर्या गडदे (खोपोली), वंशिका मोहिते, निशिता विठ्लानी (कर्जत), मनीषा लांभोरी (रोहा) यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक राजश्री अडबळ यांचे मार्गदर्शन, तर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, कैय्या यांचे सहकार्य लाभले.

Check Also

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Leave a Reply