अलिबाग : प्रतिनिधी
भारत पूर्वी मागणारा देश होता. आता मात्र भारत देणारा देश बनलायाय. अनेक देश आता भारताकडे आशेने पाहत असतात. आपला देश आता बदलतोय. भारत एक शक्ती म्हणून जगात पुढे येत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच घडले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी केले.
मोदी @9 अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगडतर्फे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा भव्य मेळावा गुरुवारी (दि. 8) अलिबागजवळील वरसोली येथील होरिझॉन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी संजय टंडन बोलत होते.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमादार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार धैर्यशील पाटील, अविनाश कोळी, मिलिंद पाटील, राजेश मापारा, अॅड. महेश मोहिते, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, मुरूड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, हेमंत दांडेकर, सुनील दामले, अशोक वारगे, सतीश लेले, उदय काठे, समीर राणे, संतोष पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मेळाव्या विविध योजनांच्या लाभार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी कार्डचे वाटप करण्यात आले.
संजय टंडन पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या पतंदप्रधानपदाच्या काकिर्दीला नऊ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत अनेक चांगल्या योजना राबविण्यात आल्या. कोव्हिडची लस सर्वांना मोफत देण्यात आली. भारतातील 18 हजार 476 गावांमध्ये वीजेचा खांब नव्हता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या सर्व गावांमध्ये 980 दिवासांत वीज पोहचवली. ज्या गावांमध्ये रस्ते नव्हते तेथे रस्ते केले, पाणी दिले. पूर्वी काम करण्यासाठी चिठ्ठी चिठ्ठी पद्धत बंद केली. यापुढेदेखील पंतप्रधान मोदींचेच नेतृत्व भारताला हवे आहे. मोदींचे हात बळकट करायचे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत समाजासाठी, देशासाठी काम करणार्यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
मी पहिल्यांदाचा माहराष्ट्रच्या सात दिवसांच्या दौर्यावर आलो. या सात दिवसांमध्ये महाराष्ट्र फिरलो. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. मी येथे बरेच काही शिकलो, देशभक्ती काय असते ती महाराष्ट्राने मला शिकवले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. या वेळी अॅड. महेश माहिते यांनी प्रास्ताविक केले, तर परशुराम म्हात्रे यांनी आभारप्रदर्शन केले.
प्रत्येकाला लाभार्थी बनवू- आमदार प्रशांत ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक चांगल्या योजना राबवल्या. सर्व सामान्यांचा विचार करून या योजना राबविण्यात येतात. त्याची माहिती गावागावांमध्ये जाऊन देऊ. आलिबाग- मुरूड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती केद्रसरकारच्या योजनेचा लाभार्थी बनवू, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.
योजनेमागची भावना महत्त्वाची – धैर्यशील पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना सुरू केली तेव्हा त्यावर टीका करण्यात आली. ही योजना सुरू केल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे बँकेत खाते उघडले गेले. त्यामुळे शासनाच्या योजनेचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाम होऊ लागला. मधले कमीशन बंद झाले. योजनेमागची भावना, प्रेरणा महत्त्वाची असते, असे माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले.