जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान


रेवदंडा : प्रतिनिधी
भाजपची अलिबाग तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नागाव येथील रूक्मिणी कॉटेजमध्ये नवनिर्वाचित भाजप तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजप अलिबाग तालुकाध्यक्षपदी परशुराम म्हात्रे, उपाध्यक्षपदी अनंत पाटील, सुजीत जनार्दन गावंड, सुनील व्यंकटेश दामले, नितीन भास्कर गुंड, सरचिटणीसपदी प्रदीप पुनकर, चिटणीसपदी विद्याधर अनिल पालेकर, अमित बळीराम पाटील, तर संघटन चिटणीसपदी अॅड. परेश अनंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. संतोष हरिभाऊ पाटील यांची तालुका प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. मनोज राजाराम रेडीज, राजेंद्र जनार्दन पेडवी, सुनील मधुकर माने, दिवाकर रामचंद्र पाटील, प्रकाश रामचंद्र पाटील, नंदकुमार पाटील, संदीप मोतीराम मोरे, रतिकांत हरिश्चंद्र पाटील, रमेश रामचंद्र ढबूशे, नंदकुमार राऊत, अमित पांडुरंग म्हात्रे, मितेश ॠद्रनाथ पाटील, प्रशांत रमण पाटील, शिवदास गंगाराम पाटील, महेंद्र शंकर पाटील यांचा तालुका कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. खारेपाट विभाग अध्यक्षपदी गोविंद कृष्णा पाटील, वैद्यकीय सेल अध्यक्षपदी गणेश अरुण गवळी, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी अशोक धर्मा वारंगे, किसान मोर्चा अध्यक्षपदी राकेश महादेव पाटील, युवती मोर्चा अध्यक्षपदी मानसी प्रशांत पाटील, प्रज्ञा प्रकोट सेल अध्यक्षपदी सुहास वासुदेव पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी पुनीत विक्रम शेठ, महिला मोर्चा अध्यक्षपदी संध्या प्रदीप शेळके, सरचिटणीसपदी आशाताई राजेंद्र बोराडे, युवा मोर्चा अलिबाग शहर अध्यक्षपदी देवेन तुकाराम सोनावणे, महिला मोर्चा अध्यक्षपदी संगीता शंकर भगत, अलिबाग शहर अध्यक्ष अंकित श्रीनिवास बंगेरा, महिला मोर्चा सरचिटणीसपदी मनीषा प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांना अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी भाजपचे दर्शन प्रभू, अलिबाग तालुका माजी अध्यक्ष हेमंत दांडेकर, सतीश लेले, माणिक बळी, सुनील दामले, दीपराज धुळप, ज्ञानेश्वर टिवळेकर आदी उपस्थित होते.