Breaking News

लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा गुरुवारी (दि. 8) केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात उरणसाठी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेलसाठी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील तर अलिबागसाठी दक्षिण रायगड उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप- शिवसेना युतीने लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविजय अभियान 24चे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघात कर्जतसाठी किरण ठाकरे, पेणसाठी प्रसाद भोईर, श्रीवर्धनसाठी प्रशांत शिंदे व महाडसाठी बिपीन म्हामुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply