Breaking News

उरणमध्ये भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता मेळावा

उरण : वार्ताहर

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी ऽ 9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन उरण विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 26) करण्यात आले होते.

या मेळाव्यात मोदी सरकारने नऊ वर्षांत केलेल्या कार्याची माहिती सांगण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आभार मानून सन्मान केला. या मेळाव्याला भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, शहराध्यक्ष कौशिक शाह, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ घरत, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, रायगड जिल्हा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, माजी नगरसेविका रजनी कोळी, जान्हवी पंडित, आशा शेलार, भाजप व्यापारी सेलचे उरण शहर अध्यक्ष हितेश शाह, सेक्रेटरी हस्तिमल मेहता, अजित भिंडे, मनन पटेल, मनोहर सहतिया उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, दीपक बेहरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply