Breaking News

नवनाथ नगर, मालधक्का झोपडपट्टीमध्ये तात्पुरते नळ कनेक्शन देण्याची मागणी

अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांचे आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील नवनाथ नगर आणि मालधक्का झोपडपट्टीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

अ‍ॅड. वाघमारे यांनी निवेदनात म्हटले की, पनवेलमधील नवनाथ नगर आणि मालधक्का झोपडपट्टीमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. येथे पाणी कनेक्शन सामूहिक पद्धतीने असून व अपुर्‍या वेळ असल्यामुळे या भागात पाणी पुरेसे नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. या भागात घरगुती तात्पुरत्या स्वरूपात नवीन नळ कनेक्शन दिल्यास त्यांना या समस्या भेडसावणार नाहीत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व झोपडपट्टीवासीयांना घरे देणार आहोत. झोपडपट्टीमध्ये नळ कनेक्शन दिले गेले नाहीत. या योजनेतील घराचे काम पूर्ण होण्यास काही कालावधी आहे. तोपर्यंत झोपडपट्टीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नळ कनेक्शन देण्यासंदर्भात सबंधित पाणीपुरवठा विभागास लवकरात लवकर उपाययोजना करण्याबाबतचे आदेश तातडीने देण्यांत यावे, असे नमूद केले आहे.

निवेदन देतेवेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर, अब्दुलकैस आलम, राजू बोदडे, नंदा टापरे, जरीना शेख आदी उपस्थित होते.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply