कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोलीमधील भाजपचे खंदे समर्थक अशोक मोटे यांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. अशोक मोटे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोटे यांनी पक्षाची याअगोदर अनेक पदे भूषविली आहेत व आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. धनगर समाज आरक्षण कृती समितीवरही त्यांनी काम केलेले आहे. धनगर समाजाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांचे योगदान आहे. सध्या यशवंत राजे अर्बन मल्टिपल निधी या संस्थेचे चेअरमन आहेत. भटके-विमुक्त समाजासाठी ही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच कळंबोलीचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर यांनी मोटे यांचे अभिनंदन केले.