Breaking News

कामोठ्यातील युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामोठे येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, माजी नगरसेविका अरुणा भगत, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, एस. के. भगत, स्वाती किंद्रे, मनोहर शिंगाडे, सचिन यमगर, सुयोग वाफारे, शैलेश परबळकर आदी उपस्थित होते.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवा कार्यकर्त्यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. यामध्ये आयुष किंद्रे, राहुल बांदेकर, जांबाज खान, पियुष पाटील, वैभव ढेंबरे, निलेश जाधव, मयूर अवघडे, शुभम दाभणे, सुमित शर्मा, साई शेलार, मल्हार शेडगे, राज नील, चैतन्य रंधीरे, आकाश सिंग, आयुष कटूरे, हर्ष तिवारी, रोहित चौहान, सोहम तोतरे, रोहित यादव, रोहित साळुंके, राहुल वाघमारे, क्रिश सिंग, साहिल गुंड, नयन चौगुले, आदित्य बरई, योगेश मोरे, नीरज सावंत, विनय ढाक, प्रसाद पंडित, जितेंद्र जगताप, दिव्येश संप्पा, तन्मय थोरात, इशांत गोरडे, ध्रुव भोईर, सुमित शर्मा, आदित्य साबळे, सिनू वाल्मिकी, आदित्य चव्हाण, यश भोसले व उदय शेलार यांचा समावेश आहे. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केेले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply