पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कष्टकरी नगर येथे उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण बुधवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कष्टकरी नगर येथील बौद्ध वस्तीतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात आले. या कामासाठी 10 लाख रुपये येवढा खर्च आला असून बुधवारी लोकार्पण झालेल्या या रस्त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. याबद्दल गावकर्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले.
या वेळी भाजपचे गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, सदस्य पूजा भोईर, धनश्री गायकवाड, भाजपचे तुराडे गावअध्यक्ष प्रतीक भोईर, माजी उपसरपंच हर्षल पाठारे, सुजित पाटील, काका गायकवाड, परमेश राठोड, करण गायकवाड, राजू राठोड, मांगर्ष राठोड, प्रमोद खाणे, विजय गायकवाड, भानुदास गायकवाड, सचिन चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …