Breaking News

भाजपची दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये भाजपचे विचार पोहचविण्यासाठी खंद्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांच्यावर पक्षवाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊ केली आहे. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून रायगड लोकसभा मतदारसंघातील दक्षिण रायगड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, बिपीन म्हामुणकर, गीता पालरेचा, प्रशांत शिंदे; उपाध्यक्षपदी दिलीप भोईर, वैकुंठ पाटील, मनोज भागवत, राजेश मपारा, मंगेश दळवी, भालचंद्र महाले, आलप मेहता, जयवंत अंबाजी, पल्लवी तुळपुळे, श्रेया कुंटे, रश्मी वाझे; चिटणीसपदी विठ्ठल शिंदकर, चंद्रकांत घोसाळकर, मनोज गोगटे, सतिश लेले, परशुराम म्हात्रे, महेंद्र चौलकर, वासुदेव म्हात्रे, प्रकाश रायकर, श्रद्धा घाग, वैशाली मपारा, नीलिमा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा कोषाध्यक्षपदी हेमंत दांडेकर, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून मारुती देवरे, बंडू खंडागळे, अनुराधा आपटे, डॉ. मंजुषा कुद्रीमोती, विनोद शहा, अक्षय ताडफळे, प्राजक्ता शुक्ला, शैलेश पटेल, जान्हवी अंजारा, संदीप ठोंबरे, डॉ. अजय जोगळेकर, सुधीर महाडिक, राजेंद्र धूमा, अमोल घोटणे, संजय भोईर, शोमेर पेणकर, नरेंद्र पाटील, नरेश खाडे, मिलिंद माने, सचिन करडे, सुरेंद्र माळी, अ‍ॅड. सुभाष पाटील, चंद्रकांत होजगे, योगेश झांजे, शोभा जोशी, भाग्यश्री आठवले, अप्पा देशमुख, निलम ठाकूर, तुकाराम पाटील, वंदना म्हात्रे, सुशीलकुमार शर्मा, दत्तात्रेय पाटील, प्रभाकर म्हात्रे, राजेश गोळे, स्वप्नील म्हात्रे, शांता भावे, राजेंद्र म्हामुणकर, अप्पा ढवळे, दर्शना म्हात्रे सरिता म्हात्रे, चिन्मय मोने, अ‍ॅड. दिव्या रातवडकर, हाजी कोठारी, संदेश पालकर, रवींद्र म्हात्रे आणि मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी हेमा मानकर, युवा मोर्चा निलेश थोरे, आदिवासी मोर्चा निमिष वाघमारे, ओबीसी मोर्चा समीर राणे, किसान मोर्चा परशुराम पाटील, अल्पसंख्याक मोर्चा रईस कादरी, आयुष्यमान भारत सेल संयोजकपदी दत्तात्रेय भुर्‍या पाटील, मच्छीमार सेल माणिक बळी, कामगार आघाडी रवींद्र पाटील, सोशल मीडिया श्वेता ताडफळे, आयटी सेल कौस्तुभ भिडे, दक्षिण भारतीय सेल पी.व्ही.सनिलकुमार, शिक्षक सेल हिरामण कोकाटे आणि सहकार सेल संयोजकपदी संजय पंदेरे यांची नियुक्ती झाली आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply