Breaking News

‘इस्रो’ची आणखी एक भरारी

श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे सोमवारी (दि. 1) श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने केली. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपक एमीसॅट व 28 नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले. ‘इस्रो’ची ही 47वी पीएसएलव्ही मोहीम असून, सोमवारची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात 749 किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि 504 किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे.

एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणार्‍या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. 436 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. रात्रीच्या वेळीसुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत, हेही सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. अशाप्रकारे या उपग्रहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply