Breaking News

विमानतळ कृती समितीतर्फे गणेश आरास स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे भव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय व तालुकास्तरीय असलेली ही स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशी दोन विभागांत होणार आहे.
प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे समाजासाठी योगदान, त्यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाचा लढा, चांद्रयान-3 आणि देशाचा वाढलेला गौरव या तीन विषयांवरील देखाव्यांना या स्पर्धेत पुरस्कृत करण्यात येईल. राज्यस्तरीय पहिल्या पाच विजेत्या सार्वजनिक मंडळांना अनुक्रमे 25 हजार रुपये, 15 हजार, 11 हजार आणि उत्तेजनार्थ सात हजार; तर राज्यस्तरीय घरगुती गणपती आराससाठी 11 हजार रुपये, सात हजार, पाच हजार आणि अडीच हजार रुपये अशी पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल.
तालुकास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेसाठी 11 हजार, सात हजार, पाच हजार आणि उत्तेजनार्थ दोन हजार रुपये तसेच घरगुतीसाठी सात हजार, पाच हजार, अडीच हजार रुपये व उत्तेजनार्थ 1500 रुपये अशी पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येतील.
प्रथम क्रमांकाच्या तालुकास्तरीय घरगुती आणि सार्वजनिक विजेत्या मंडळास राज्यस्तरीय स्पर्धेत सरळ प्रवेश मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता क्युआर कोडद्वारे तसेच https://docs.google.com/forms/d/e/1F-IpQLSfq01U0fmkyPU4cL6RcqmhtPPHlqxc87mF6MfkYG6Mil7wFbQ/viewform या गुगल फॉर्म लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन कृती समितीतर्फे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply