प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गाण्यांची मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) पहाटे 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी संगीत रसिकांचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा ‘दिवाळी पहाट’चे सातवे वर्ष असून यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर ही प्रसिद्ध गायिका सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी अभिषेक पटवर्धन (9029580343), रोहित जगताप (8691930709), अभिषेक भोपी (9820702043) किंवा अक्षय सिंग (9820838851) या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.