पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेजचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निशा नायर यांंच्यासह शिक्षकांचे मंगळवारी (दि.5) अभिनंदन केले.
महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने आणि इएसएफईद्वारे रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेजचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या सोहळ्यात प्राचार्य डॉ. निशा नायर, वरिष्ठ शिक्षिका स्वप्ना भांडवलकर आणि महेंद्र पाटील यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
भारतातील विविध राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थांना गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कार देण्यात आले. अशा नामांकित व्यासपीठावर रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट कनिष्ठ महाविद्यालयचा पुरस्कार मिळणे हा अभिमानाचा क्षण आहे.
कॉलेजला पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्राचार्यासह शिक्षकांचे अभिनंदन केेले. या वेळी प्राचार्य निशा नायर, शिक्षक दुर्गा मौर्या, अंजली डाके, नमिता आखुरी, प्रणाली जाधव उपस्थित होत्या.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …