Breaking News

रिक्षा-कार धडक अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील डिकसळ गावाजवळ सोमवारी रिक्षा आणि कार यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून, कारबद्दल अधिक चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

आयन टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीची  हुंडाई एक्ससेंट कार (एमएच-01,सीजे -2948) सोमवारी रिक्षावर जाऊन धडकली होती. त्यानंतर रिक्षाने पेट घेतला आणि तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तब्बल साडे पाचतास लावले होते. गुन्हा दाखल होत नसल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. शेवटी नेरळ पोलिसांनी कार चालकाची तक्रार आधी घेतली, त्यात कार चालक अब्दुल शमीम अब्दुल हमीद सिद्धीकी (रा. नेरळ ममदापूर) हा आपल्या मित्राच्या कारमधून नातेवाईकांना घेऊन जात होता. डिकसळ गावाजवळ अचानक कोणताही सिग्नल न देता रिक्षा (एमएच-05, सीजी-4351) यु-टर्न घेऊन वळली आणि रिक्षेला कारची धडक बसली. त्यावेळी चालकाने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु रिक्षेने पेट घेतल्याने त्या रिक्षेमधील सुभाष जाधव, शुभांगी जाधव आणि सरिता साळुंखे या तिघांचा होरपळून मृत्यू झाला.  ते स्वतःच मारण्यास कारणीभूत ठरल, असे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबातील संदीप साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत आपली आई, मावशी आणि काका यांच्या मृत्यूस प्रवासी कार (एमएच-01,सीजे-2948) जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. धुळवड असल्याने रस्त्यावर फारशी वाहने नव्हती. कार भरधाव वेगाने येत होती. कार चालक अब्दुल शमीम अब्दुल हमीद सिद्धीकी यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून  रिक्षेला धडक दिल्याने अपघात घडला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस कार चालक जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिरीश भालचिम करीत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply