Breaking News

पेण आदिवासी बालिका बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी नाराधाम आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेप व 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 20 डिसेंबर 2020 ही घटना घडली होती. जिल्हा पोलिसांनी आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले.
याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू होता. जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर याच्या न्यायलायात या खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या खटल्यातील आरोपी आदेश पाटील याच्यावर दोष सिद्ध झाले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू माडताना आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केली होती.
जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजदेकर यांनी या प्रकारणी बुधवारी (दि. 20) शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपी आदेश पाटील यास भारतीय दंड संहितेचे कलम 376 ए, 376 एबी तसेच पाक्सो कायद्याचे कलम 6 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 5000 हजार रुपये दंड, जर दंड भरला नाही तर आणखी सहा महिने कारावास अशी सुनावली. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply