Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रंगला क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य प्रतीकादास यांच्या प्रेरणेने व मुक्ता खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या समारोप समारंभाला पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, स्टेट बोर्ड स्कूल कमिटी सदस्य राजेश गायकर, अ‍ॅड. आशा भगत, प्रमुख मान्यवर म्हणून रायगड विभागीय सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, स्टेट बोर्डच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply