Breaking News

पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वरई ग्रामपंचायत हद्दीमधील दहिगाव येथील तरुण विवेक बबन भालेराव हा 27 जुलै रोजी गावाजवळ नाला ओलांडत असताना वाहून गेला होता. त्याच्या स्मरणार्थ शंकर भुसारी मित्र मंडळातर्फे दहिगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे   वाटप करण्यात आले. या वेळी माजी सरपंच शंकर रामा भुसारी, तसेच दीपक भुसारी, जितेंद्र देशमुख, धनंजय देशमुख, महेश देशमुख, अरुण देशमुख, प्रमोद भुसारी, देहू ठाकरे आदींच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. त्या वेळी दहिगाव शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply