Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती

सातारा ः रामप्रहर वृत्त

कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अण्णा काका पाटील व डॉ. अरुणकुमार जयराम सकटे यांनी संपादित केलेल्या एम्प्लॉयमेंट अ‍ॅण्ड इन्कम जनरेशन थ्रो मनरेगा या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.12)करण्यात आले. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
‘रयत’चे सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के, बी.एन. पवार, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोजगार हमी योजना आणि ग्रामीण विकासाच्या दिशा याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी असणारे विकास देशमुख यांनी रोजगार हमी योजनेमुळे महाराष्ट्रातील कुशल कामगारांना रोजगार व उत्पन्नाची निर्मिती झाल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त भागांमध्ये वरदान ठरलेल्या या रोजगार हमी योजनेद्वारे महाराष्ट्राने भारताला ग्रामीण रोजगाराचे एक प्रतिमान दिल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजीराव पाटील यांनी, सूत्रसंचालन डॉ. संदीप किर्दत यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. रोशन शेख यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशासकीय सेवक, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply