कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते विकासाचे ‘कमळ’ हाती घेत आहेत. त्यानुसार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.12) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, कर्जत विधानसभा विस्तारक हेमंत नांदे, उपसरपंच सुप्रिया भगत, जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष विनोद भगत, दिनेश राठोड आदी उपस्थित होते.
या वेळी कर्जत उमरोली येथील शेकापचे वॉर्ड अध्यक्ष रामदास शेलार, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण, शेकापचे मनीष ठाणगे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच जोत्स्ना भगत, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष राजेश नाईक, शेकाप कार्यकर्ते सुरज भगत, चरणदास भगत यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply