उरण : वार्ताहर
33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उरण तालुका प्रचार दौरा शनिवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात झाला. सकाळी जासई येथील हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेऊन प्रचार दौरा सुरू झाला.
उरण तालुक्यात प्रत्येक गावात खासदार तथा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उरणचे
आमदार मनोहरशेठ भोईर, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांचेही विंधणे ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश पाटील यांनी स्वागत केले. गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महेश बालदी यांनी पुष्पहार घालून प्रचार फेरीस सुरुवात केली.
उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत ग्रुपचे माजी सरपंच नरेश पाटील, भाजप कार्यकर्ते तथा उद्योजक प्रसाद पाटील, विंधणे शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पाटील, उरण पंचायत समिती सदस्या दिशा प्रसाद पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी कृष्णा पाटील, काजल पाटील, सुनील बाळकृष्ण भोईर, सचिन पाटील, दयानंद नवाळे, जयराम पाटील, रवी पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.